Bhagwad Geeta Se Sikhen Safalta ke Sutra
185 pages
English

Vous pourrez modifier la taille du texte de cet ouvrage

Découvre YouScribe en t'inscrivant gratuitement

Je m'inscris

Bhagwad Geeta Se Sikhen Safalta ke Sutra , livre ebook

-

Découvre YouScribe en t'inscrivant gratuitement

Je m'inscris
Obtenez un accès à la bibliothèque pour le consulter en ligne
En savoir plus
185 pages
English

Vous pourrez modifier la taille du texte de cet ouvrage

Obtenez un accès à la bibliothèque pour le consulter en ligne
En savoir plus

Description

The big turning point in his life came in 1933, at age 21, when he met Abdul Bari Alig, a scholar and polemic writer who encouraged him to find his true talents and read Russian and French authorsDuring his lifetime, Saadat Hasan Manto was charged with obscenity six times in India and Pakistan for his writings. Of his writing, he said, ''If you cannot bear these stories then the society is unbearable.'' Manto was a prolific Indo-Pakistani writer who published 22 short stories collections and other writings during his career. Manto often wrote about societal issues that he felt hindered humanity.

Informations

Publié par
Date de parution 01 janvier 0001
Nombre de lectures 0
EAN13 9789352782352
Langue English

Informations légales : prix de location à la page 0,0132€. Cette information est donnée uniquement à titre indicatif conformément à la législation en vigueur.

Extrait

भगवद्गीतेतून शिका सफलतेची सूत्रे

eISBN: 978-93-5278-235-2
© लेखकाधीन
प्रकाशक : डायमंड पॉकेट बुक्स (प्रा.) लि.
X-30, ओखला इंडस्ट्रियल एरिया, फेज-II नई दिल्ली-110020
फोन : 011- 41611861, 40712100
फैक्स : 011- 41611866
ई-मेलः : ebooks@dpb.in
वेबसाइटः: www.diamondbook.in
संस्करणः : 2014
भगवद्गीतेतून शिका सफलतेची सूत्रे
by : ड़ॉ. कपिल कक्कड
 
 
 
 
अर्पण
 
हे पुस्तक त्या
परमेश्वराला
अर्पण आहे, ज्याने मी आणि माझी आई
स्व. श्रीमती सरिता कक्कड
यांच्याकडून हे पुस्तक लिहून घेतले. त्याचबरोबर मी माझे
वडील, बहीण आणि पत्नी
यांचाही त्यांच्या संपूर्ण सहकार्यासाठी
आभारी आहे.
प्रस्तावना
मी हे पुस्तक लिहिले तेव्हा इतक्या कमी वेळेत ते इतके लोकप्रिय होईल, याची कल्पना केली नव्हती. यामुळे मी आश्चर्यचकीत झालो. हे पुस्तक वाचल्यानंतर याच्या पाच-दहा प्रती खरेदी करण्यासाठी लोक माझ्या ऑफिसमध्ये येऊ लागले. विचारल्यावर सर्वांचे उत्तर जवळपास सारखेच होते, “या पुस्तकाने आम्हाला अतिशय प्रभावित केले असून आमचे आधीचे समज आणि विश्वासाला आव्हान देत आतापर्यंत ज्या गोष्टींबद्दल अनभिज्ञ होतो, त्याबाबतीत आम्हाला सजग केले. आता ही माहिती आमच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत पोहचवायची आहे.”
या प्रतिसादामुळे यातील प्रकरणात काही नवीन माहिती समाविष्ट करण्याबरोबरच ‘रहस्यभेद’ हे नवीन प्रकरण समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. हे नवीन प्रकरण आपल्याला सांगते की आपण आपले मन आणि सृजनशीलता कशा प्रकारे उजळू शकतो. यामध्ये मेंदूच्या कार्यप्रणालीवर प्रकाश टाकला आहे, त्याचबरोबर यात युगांची गणनाही केली आहे. कारण बहुतेक लोक असे समजतात, की आपण सारे कलियुगात जगत आहोत. या पुस्तकाचा विषयच थोर ऐतिहासिक माहाकाव्य आणि आपले जीवन यात प्रत्यक्ष संबंध साधणारा आहे. आपल्या जीवनातील अवघड आणि गुंतागुंतीच्या समस्या सोडवायला मदत करणारा आहे.
भगवद्गीता विवेक, बुद्धी आणि प्रतिभेचा संगम असलेला असा ग्रंथ आहे, ज्यामध्ये सर्व वेदांचा समावेश आहे. हे एक असे पुस्तक आहे, जे लाखो लोकांनी वाचले असून कोट्यावधी लोकांनी त्याबद्दल ऐकले आहे. भगवद्गीतेतील प्रत्येक उदाहरण आपल्या जीवनाशी संबंधित आहे; पण मी फक्त आपल्या जीवनाशी संबंधित असलेल्या प्रकरणाचीच निवड केली आहे. आता तर मानसशास्त्र आणि न्यूरोलॉजीने खूप प्रगती केली आहे, तरीही भगवद्गीता, आपले जीवन आणि आपल्या मनोवृत्ती यात नैसर्गिकत: कसा संबंध आहे, हे कळल्यावर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकीत व्हाल.
प्रसंग
एका श्रीमंत शेतकर्‍याने एका तरूणाला कामावर ठेवले. त्या तरूणाला रोज पाच झाडे तोडायची होती. पहिल्या दिवशी काम झाल्यावर आपण सहा झाडे तोडली असल्याचे त्या तरूणाला आढळून आले. तो खूप आनंदीत झाला आणि मालकाला आपले यश सांगण्याचा मोह त्याला आवरला नाही. त्याने मालकासमोर आपली शेखी मिरवली. पुढील दिवसात तो आणखी जास्त झाडे तोडून दाखविल, असे त्याने मालकाला सांगितले.
दुसर्‍या दिवशी पूर्ण उत्साह आणि जोशात त्याने झाडे तोडायला सुरूवात केली. दिवस संपला तेव्हा आपण फक्त पाचच झाडे तोडू शकल्याचे त्याला आढळून आले. आज आपला दिवस नव्हता, असे त्याने स्वत:ला समजावले. उद्या आपण नक्की सात झाडे तोडू. वास्तवात तिसर्‍या दिवशी तो चारपेक्षा जास्त झाडे तोडू शकला नाही. आपण जीव तोडून परिश्रम करीत आहोत, तरीही झाडांची संख्या घटत असल्याचे पाहून तो अस्वस्थ झाला. तो निराश होऊन मालकाकडे गेला आणि मालकाला सर्व काही सांगितले. मालकाने विचारले, “तू शेवटच्या वेळी आपल्या कुर्‍हाडीला धार कधी लावली होती?”
सध्याची आव्हाने
आपल्यालाही अशा अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो जेव्हा कठोर परिश्रम करूनही आपल्या मनासारखे यश मिळत नाही. आपल्याच बाबतीत असे का होत आहे, असा आपण विचार करू लागतो. खरं तर आपले सर्व लक्ष समस्येवरच केंद्रित होते आणि तोडगा तसेच आत्मनिरीक्षण हेच जीवनातील समस्याचे कुलूप उघडण्याची चावी आहेत.
रोजच्या दिवसासोबत आपले जीवन अधिक कोड्यात पडत असते कारण हा दिवस आपल्यासाठी पुरस्कार आणि आव्हाने असे दोन्ही घेऊन येत असतो. आपण कितीही हुशार आणि बुद्धिमान असलो तरीही अशा प्रकारच्या रहस्यमय परिस्थितीसमोर विवश होतो. आपल्याला प्रत्येक क्षणी आव्हानांचा सामना करावा लागतो आणि ती पार करण्यासाठी आपण अथक प्रयत्न करीत असतो. प्रत्येक प्रकारच्या अडचणीवर मात करायला आपण तयार असतो, कारण कुटुंबातील प्रत्येकाला अपेक्षित सुख सुविधा द्यायच्या असतात.
प्रत्येक अडचणीवर मात करण्याची आपल्याकडे जिद्दही असते, पण कधी कधी परिस्थितीच अशी निर्माण होते, की अनेक विचित्र प्रश्न आपल्याला घेराव घालतात. अशा वेळी जीवन कसे जगावे आणि कोणत्या ठराविक पद्धतीने चालायला हवे. आपले जीवन योग्य पद्धतीने चालविण्याच्या नादात आपण मोहात चुकीच्या पद्धती स्वीकारतो. कधी कधी तर आपली मूल्येही पणाला लावतो. परिणामी आपण दुष्ट होतो. अशा कृत्यावर पश्चाताप करण्याशिवाय आपल्या हाती काहीही राहत नाही.
अर्जुनाचे धर्मसंकट
महाराज पांडूचा पुत्र अर्जुन कुरूक्षेत्राच्या रणांगणावर लढण्यासाठी सज्ज होता, परंतु युद्धात दोन्ही बाजूला उभे असलेले आपले पितामह, गुरू, मामा, भाऊ, पुतणे, मित्र, सासरे आणि शुभचिंतकांना पाहिल्यावर त्यांच्या मनात द्विधा निर्माण झाली. आपले कुटुंबिय, मित्र आणि नातेवाईकांना पाहून त्याच्या मनात करूणा आणि दया निर्माण झाली.
ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे त्याने पाहिले. त्याला आपल्याच माणसांशी युद्ध करायचे होते. त्यांच्याच आशीर्वादाने तो मोठा झाला होता. त्यांच्याशीच युद्ध कसे करायचे? असा विचार केल्यावर मानसिकरित्या तो उद्धवस्त झाला. ज्यांनी धनुष्य-बाण चालवायला शिकविले, त्यांच्यावरच नेम धरायचा? अशा विचित्र परिस्थितीत तो भ्रमित झाला. आपण कुठे जावे नि काय करावे ते त्याला कळत नव्हते. या विषयी त्याला कोणीही काहीही आश्वासन देत नव्हते, की हे सर्व कशासाठी करायचे?
पहिल्या अध्यायातील २८ व्या श्लोकात अर्जुन म्हणतो, “माझ्या प्रिय कृष्णा, आपल्याच मित्र आणि बांधवांशी युद्ध करायचे पाहून माझे शरीर थरथरत आहे आणि घसा कोरडा पडला आहे.”
पहिल्या अध्यायातील २९ व्या श्लोकात अर्जुन म्हणतो, “माझे पूर्ण शरीर थरथरत आहे. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले आहेत. गांडीव धनुष्य माझ्या हातातून निसटत असून माझी त्वचा जळत आहे.”
पहिल्या अध्यायातील २९ व्या श्लोकात अर्जुन म्हणतो, “मी इथे जास्त वेळ उभा राहू शकत नाही. मी स्वत:ला विसरलो असून माझे डोके फिरले आहे. हे कृष्णा, केसरी राक्षसाचा वध करणार्‍या, मला तर फक्त ही दुर्दैवाची कारणे दिसत आहेत.”
पहिल्या अध्यायाच्या (३७-३८) श्लोकात अर्जुन म्हणतो, “हे जनार्दना, हे लोक अजून लोभाने भरलेले आहेत. त्यांना मित्राशी किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी लढणे किंवा त्याचा वध करणे यात काही वाईट वाटत नाही; पण आपल्याला एखादे कुटुंब नष्ट करण्याचे पाप कळाल्यावरही ते पाप कशासाठी करायचे?”
आज आपण तीन प्रकारच्या रणांगणावर आहोत. सर्वात पहिले तर आपण आपल्याशीच लढत आहोत आणि आपण कोण आहोत, आपल्याला काय करायचे आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, हे माहीत करून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. दुसरे म्हणजे आपण भोवतालच्या लोकांशी संघर्ष करीत आहोत कारण आपण जो काही विचार करीत आहोत, तो योग्य आहे. तेच चांगले आणि योग्य का आहे, हे त्यांना दाखवून द्यायचे आहे. तिसरे आपण भौतिक वस्तुंसाठी संघर्ष करीत आहोत. ते फक्त आपल्याला हवे आहे म्हणून ही तृष्णा नाही, तर दुसर्‍यांकडे आहे म्हणूनही ते आपल्याला हवे आहे. तसेच ज्याचा आपल्याला वेळोवेळी सामना करावा लागतो, त्या अस्पष्टतपणावरही हे पुस्तक प्रकाश टाकते.
अर्जुन एक धीर, गंभीर आणि प्रामाणिक व्यक्ती होता. आपल्या नातेवाईकांशी असलेले वैर कळल्यानंतरही आपले राजकीय अधिकार आणि भौतिक नाव सोडायलाही तयार होता कारण त्याला त्यांच्याशी संघर्ष करायचा नव्हता. भगवान कृष्ण मोठ्या धैर्याने त्यांच्या मनातील सर्व गुंतागुंत सोडवितात आणि त्याला कर्तव्याची जाणीव करून देतात.
कृष्ण : प्रत्येकाचा सल्लागार
सध्याच्या काळात आपल्या अडचणी सोडविण्यासाठी भगवान कृष्ण आपल्यासोबत नाहीत; पण आपण एकटेही असाह्य नाहीत. भगवद्गीतेतील दहाव्या अध्यायातील वीसाव्या श्लोकात प्रभू म्हणतात, “प्रत्येक जिवंत व्यक्तीच्या हृदयात वास करणारा महान आत्मा मीच आहे. मीच सर्व जीवांचा आदि, मध्य आणि अंत आहे.”
आज आपल्या सर्वांच्या आत एक अर्जुन दडलेला आहे, जो आपल्या भोवताली एखादा कृष्ण किंवा गुरूचा शोध घेत असतो. आपण अचेतनरित्या अशा एखाद्या व्यक्तीच्या शोधात असतो, जो कठीण प्रसंगी आपल्याला मार्गदर्शन करू शकेल आणि आपली उत्पादकता तसेच क्षमता वाढवू शकेल. आपल्या सर्वांसोबत कृष्ण हाच तो सल्लागार आहे, जो त्या सत्य ज्ञानाचा स्वामी आहे. ज्याच्यामुळे अज्ञानाचा अंधार नाहीसा होऊ शकतो. त्याशिवाय आपल्याला इतर शोध आणि वैज्ञानिक शोधांचीही मदत मिळते.
परमेश्वर आपल्या सर्वांच्या आत दडलेला आहे. त्यामुळे आपण आपल्या समस्यांचे समाधान शोधण्यासाठी आपल्यात डोकावायला हवे. त्या सर्वोच्च सत्तेपुढे आपले कर्म आणि परिस्थितीचे समर्पण करीत, ध्येय गाठण्यासाठी पूर्ण निष्ठेने प्रयत्न करायला हवेत. एकदा ध्येय नक्की केल्यावर त्यासाठी आपले श्रम आणि निष्ठा देणे आवश्यक असले, तरीही आपण ज्यांचे स्वामी नाहीत, अशा परिणामांची अपेक्षा ठेवणे अयोग्य आहे. तुम्ही जर परिणामांच्या शक्यतेबाबतच विचार करीत राहिलात तर कामाच्या प्रक्रियेवरून तुमचे लक्ष बाजूला ढळते. इतकेच नाही, आपण काय मिळविण्याचे अधिकारी आहोत आणि काय मिळविण्याचे अधिकारी नाही, याचाही आपल्याला विसर पडतो.
हे पुस्तक कशा प्रकारे तुम्हाला मदत करते. हे भगवद् गीतेतील ते ज्ञान तुमच्या समोर आणते, जे जीवन समजून घेण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर ते त्या मानसिक आणि शास्त्रीय शोधांवरही भर देते, ज्यानुसार तुमच्यात कोणत्याही समस्येचा तोडगा काढण्याची क्षमता दडलेली आहे. हे जाणणेही अनिवार्य आहे, की समस्या आणि परिस्थितीशी प्रभावीरित्या कसे निपटावे. हे पुस्तक तुम्हाला फक्त काय करायचे आहे, हेच शिकवत नाही, तर का करायचे आहे तेही सांगते.
 
मनोगत
 
प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात धन, मान आणि सफलता हवी असते; पण खूप कमी व्यक्ती हे मिळवू शकतात, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. सर्वशक्तीमान परमेश्वर धन, आनंद, प्रसन्नता आणि यश देताना कंजूष का होतो, असा विचार करायला व्यक्ती विवश होते. या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला शास्त्रीय आणि आध्यात्मिक माहिती मिळते. हे आध्यात्मिक ज्ञान भगवद्गीतेवर आधारित आहे. मी शास्त्र आणि आध्यात्म यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला आहे, कारण माझा असा समज आहे, की मानवी विज्ञान हे आध्यात्मिक विज्ञानाचा एक लहानसा भाग आहे.
भगवद्गीताच का?
तुम्हाला सर्वांना माहीत आहे, त्याप्रमाणे भारतीय धर्मात आणि पुराणात विविध देवी देवतांचे वर्णन आढळून येते; पण कोणत्याही देवतेने आपण संपूर्ण सृष्टीचा सृजक असल्याचे जाहीर केले नाही. असे फक्त भगवान श्रीकृष्णानेच म्हटले आहे. भगवद्गीतेतील श्लोकांचा अभ्यास केल्यावर असे आढळून येते, की प्रभूने फक्त खरे ज्ञान दिले तसेच सर्व सृष्टीचा नियंता असल्याची घोषणाही केली. हे काही धार्मीक पुस्तक नाही कारण धर्म आणि आध्यात्म यात खूप फरक आहे. धर्म माणसाने निर्माण केला आहे, तर आध्यात्म ही प्रभूची देणगी आहे.
प्रभूने भगवद्गीतेत स्पष्ट स्वरूपात म्हटले आहे, की आपण पक्षपाती नाही की कंजुषही नाही. नवव्या अध्यायातील श्लोक क्रमांक ९ मध्ये ते म्हणतात, “ही सर्व कर्म मला बांधू शकत नाहीत. मी या भौतिक हालचालीपासून अनासक्त आहे.” तुम्ही आता असे विचारू शकता, की जर प्रभू पक्षपाती नाही, तर या जगात काही माणसे धनी आणि काही निर्धन का असतात?
मागील जन्मी केलेल्या कर्माच्या आधारेच माणूस विविध वातावरणात जन्म घेत असतो. तरीही आपण निसर्ग नियमांचे पालन केले, तर नक्कीच सफलता मिळते. मग, तुमचा जन्म कुठेही झाला असला तरीही.
एखाद्या व्यक्तीने दुसर्‍याच्या तुलनेत कठोर परिश्रम

  • Univers Univers
  • Ebooks Ebooks
  • Livres audio Livres audio
  • Presse Presse
  • Podcasts Podcasts
  • BD BD
  • Documents Documents