Jeevan Ke Prerak
150 pages
English

Vous pourrez modifier la taille du texte de cet ouvrage

Découvre YouScribe en t'inscrivant gratuitement

Je m'inscris

Jeevan Ke Prerak , livre ebook

-

Découvre YouScribe en t'inscrivant gratuitement

Je m'inscris
Obtenez un accès à la bibliothèque pour le consulter en ligne
En savoir plus
150 pages
English

Vous pourrez modifier la taille du texte de cet ouvrage

Obtenez un accès à la bibliothèque pour le consulter en ligne
En savoir plus

Description

Such a treasure of Surya Sinha's thoughts, which if we take away in our life, we can get every happiness of the world. In the book, Jeevan Ke Prerak, some such ideas have been included, which will fill such values ??in you and will make you learn some such lessons related to honesty, truth, obligation, faith, love, loyalty and duty etc., So that you will see the path of success in front of you. A motivational book showing the way at every turn of life

Informations

Publié par
Date de parution 06 novembre 2020
Nombre de lectures 1
EAN13 9789352789337
Langue English
Poids de l'ouvrage 1 Mo

Informations légales : prix de location à la page 0,0158€. Cette information est donnée uniquement à titre indicatif conformément à la législation en vigueur.

Extrait

जीवनातील प्रेरक
विचारांचे एक असे पुस्तक, ज्यामध्ये सामावले आहे तुमचे संपूर्ण जीवन आणि तुमच्या जीवनातील संकल्प
 

 
eISBN: 978-93-5278-933-7
© लेखकाधीन
प्रकाशक डायमंड पॉकेट बुक्स (प्रा.) लि.
X-30 ओखला इंडस्ट्रियल एरिया, फेज-II
नई दिल्ली- 110020
फोन : 011-40712100
ई-मेल : ebooks@dpb.in
वेबसाइट : www.diamondbook.in
संस्करण : 2017
जीवनातील प्रेरक (Marathi)
By - Surya Sinha
 
 

अर्पण
माझ्यावर अपार कृपा करणार्‍या माता वैष्णो देवीच्या चरणी हे पुस्तक अर्पण
सप्रेम भेट
प्रिय स्नेही, श्री / श्रीमती / कुमारी
____________________________________________ _________________________________________________________________ __________________________________________________________________
सस्नेह ________________________________ _______________________________

‘जीवनातील प्रेरक’ हे पुस्तक आपल्या जीवनातील एक अमोल मोत्यांची माळ आहे, जी आपल्या जीवनाला एक नवीन आयाम देते. तुम्ही तुमचे मित्र, नातेवाईक, शुभचिंतक आणि शेजारी यांना ही अमोल विचारांची माळ ‘जीवनातील प्रेरक’ भेट म्हणून द्या.
 
 
 
 

समाज कल्याणासाठी तसेच व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे पुस्तक तुम्ही कोणालाही भेटवस्तू म्हणून सप्रेम भेट देऊ शकता. भेट देण्यासाठी ज्या कोणाला या पुस्तकाची आवश्यकता असेल, ते सर्व हे पुस्तक सवलतीच्या दरात ‘विनर्स ट्रॅक’ च्या भेट योजनेनुसार प्रकाशकाशी थेट संपर्क साधून मागवू शकता.
असे साकारले हे पुस्तक
‘जीवनातील प्रेरक’ या माझ्या पुस्तकाची नवीन आवृत्ती वाचकांसमोर सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. एक असा आनंद जो मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. २००६ साली ‘जीवनातील प्रेरक’ ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. संपूर्ण देशात याच्या प्रती हातोहात विकल्या गेल्या. परिणामी २००६ मध्येच मला या पुस्तकाची दुसरी आवृत्ती काढावी लागली. पुस्तकाची दुसरी आवृत्तीही बाजारात बेस्ट सेलर ठरली.
‘जीवनातील प्रेरक’ माझ्या हुशार वाचकांना आवडले, पण त्यांची एक तक्रारही होती. हजारो वाचकांनी मला पत्रे लिहिली आणि फोन केले, की महापुरूषांची अमर वाणी आणि त्यांचे प्रेरक प्रसंग याचे साहित्य बाजारात विपूल आहे. आदरणीय वाचकांनी लिहिले, ‘आम्हाला इतर महापुरूषांचे विचार नाही, तर सूर्या सिन्हा यांचे विचार हवे आहेत. आम्हाला त्यांचेच विचार वाचायचे आहेत. म्हणून पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीत फक्त त्यांचेच विचार समाविष्ट करा.’
कोणत्याही लेखकासाठी त्याचे वाचक हाच त्याचा खरा आधार असतात. वाचकांनी मला ज्या प्रेमाने आणि आपलेपणाने ही विनंती केली, ती पाहता त्याकडे दुर्लक्ष करणे मला शक्य नव्हते. ‘जीवनातील प्रेरक’ ची ही तिसरी आवृत्ती दोन भागात सादर केली असून ती तुमच्या हातात आहे. हिच्यामध्ये फक्त माझेच म्हणजे सूर्या सिन्हा याचेच विचार आहेत.
मी या पुस्तकात जीवनातील असे काही मोती वेचण्याचा प्रयत्न केला आहे, जे आपल्याला जीवनातील यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी मदत करतील. ज्यांचा स्वीकार करून आपण प्रगती करू शकू. आपले ध्येय गाठू शकू. तसेच सुखी आणि समृद्ध जीवन जगू शकू.
कोणतेही चांगले, उच्च आणि आमूल्य विचार आपल्या जीवनात उतरविण्यासाठी अशा एका मनाची आवश्यकता असते, ज्याची तुम्हाला योग्य मार्गावरून पुढे नेण्याची आणि तुम्हाला यशस्वी करण्याची इच्छा असावी. तसेच नवीन विचारांचे स्वागत करण्याचीही त्याची इच्छा असावी.
मुलांना आपल्या जीवनातील पहिला धडा आपल्या कुटुंबातूनच शिकतात. प्रत्येक माणसासाठी त्याचे कुटुंब हेच पहिली शाळा, महाविद्यालय, पहिले कार्यालय आणि खेळाचे पहिले मैदान असते. कोणी तरी अतिशय योग्यच म्हटले आहे, की ‘घरातील एक वडिलाधारी व्यक्ती शंभर शिक्षकांच्या बरोबर असते.’
मुले चारित्र्यवान घडावी यासाठी आधी आपण चांगल्या गुणांचा स्वीकार करायला हवा. मग आपल्या मुलांना चांगले -वाईट आणि भले-बुरे यांची ओळख करून द्यावी. असे म्हणतात की प्रामाणिकपणा, सारासार विचार, परिश्रम, शिस्त, जबाबदारी, विश्वास, निष्ठा, आस्था, दया, प्रेम या गुणांच्या मदतीने व्यकâती आपल्या उत्तम चारित्र्याचे निर्माण करू शकते.
आता मला या ठिकाणी असेही म्हणायचे आहे, की ‘जीवनातील प्रेरक’ हे काही फक्त पुस्तक नाही, तर ते माझे अनुभव, माझी जाणीव आणि माझे विचार यांचा एक अनुपम संग्रह आहे. हे त्या पुस्तकांपैकी एक आहे, ज्याला तुम्ही आपले घर, कार्यालय किंवा वैयक्तिक रूममध्येही ठेवू शकता. म्हणजे मग तिथे येणारी प्रत्येक व्यक्ती हे पुस्तक वाचून काही चांगले संस्कार मिळवू शकेन. हे पुस्तक वाचणार्‍या व्यक्तीच्या मनात हजारो नवीन विचार येतील. जे त्याला सफलतेचा मार्ग दाखवतील. यामुळे प्रत्येक व्यक्तीला प्रामाणिकपणा, सत्य, जबाबदारी, कर्तव्य, परिश्रम, विश्वास आणि अनेक धडे शिकायला मिळतील. हे पुस्तक तुम्ही स्वत: तर नक्कीच वाचाल; पण त्याच बरोबर यात दिलेले विचार तुम्ही आपल्या कुटुंबांतील सदस्य, मित्र, शेजारी, ऑफिसमध्ये सोबत काम करणारे सहकारी यांनाही ऐकविण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे तुम्हाल आत्मसमाधान तर मिळेलच; पण त्याच बरोबर तुमचे जीवन सफल करण्यासाठीही हे उपयुक्त ठरेल.
कोणी तरी म्हटले आहे,
‘जे काही सत्य आहे, आदरणीय आहे, योग्य आहे, शुद्ध आहे, आवडीचे आहे, प्रतिष्ठित आहे, थोर आहे, कौतुकास्पद आहे, त्याचा स्वीकार करायला हवा.’
- सूर्या सिन्हा
अनुक्रमणिका
असे साकारले हे पुस्तक भूत, वर्तमान, भविष्य अनुभव, धडा अहंकार आत्मविश्वास आशा-निराशा प्रामाणिकपणा उपदेश कथा कर्तव्य कर्म क्रोध गुण-अवगुण चुका गरिबी चारित्र्य काळजी जबाबदारी जीवन टीम वर्क ठाम संकल्प धैर्य धन-दौलत निंदा नेतृत्त्व, लीडरशीप निर्णय पुस्तक परिवर्तन परिस्थिती कुटुंब परिश्रम परोपकार प्रतिभा प्रेम प्रयत्न प्रशंसा प्रसन्नता मुले शहाणपणा बॉस भीती नशीब भले-बुरे थोरपणा मैत्री-दोस्ती मूर्खपणा यश-प्रसिद्धी तरूण पिढी योग्यता ध्येय नफा-तोटा व्यक्तिमत्त्व व्यवसायिक प्रशासन व्यवहार विचार आपत्ती विश्वास विनम्रता वादा शब्द, वचन शिक्षा मद्यपान आरोग्य स्त्री स्वभाव संकट शक्य-अशक्य सफलता वेळ योग्य-अयोग्य सुख-दु:ख सुंदरता साहस, उत्साह स्वप्ने विचार घटित-अघटित हार-जीत ज्ञान-अज्ञान
भूत, वर्तमान, भविष्य
तुमच्यासाठी सर्वात अवघड काम कोणते आहे, ते तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल, तर माहीत करून घ्या, की तुमच्यासाठी सर्वात अवघड काम ते आहे, जे तुम्ही काल करू शकला नाहीत.
* * *
तुम्हाला उद्यासाठी तयारी करायची असेल, तर तुम्ही आजचा सदुपयोग करा, कारण आजमधूनच सोनेरी उद्या निर्माण होत असतो.
* * *
गेलेल्या काळाकडे पाहून आपण जीवन समजू शकतो; पण येणार्‍या काळावर लक्ष ठेवून आपण जीवन जगू शकतो.
* * *
तुम्ही फक्त वर्तमानाची काळजी करा, भविष्य आपली काळजी स्वत: करते.
* * *
इतिहास निर्माण करणार्‍यांकडे कधीही इतिहास लिहिण्याइतका वेळ असत नाही. त्यामुळेच असे म्हणतात की इतिहास निर्माण करणारे वेगळे असतात आणि इतिहास लिहिणारे वेगळे असतात.
* * *
कधीही कालची किंवा उद्याची काळजी करू नका, कारण कालपासून आपल्याला काहीही मिळत नाही, तर भविष्याची आपल्याला काहीही कल्पना नसते, त्यामुळे फकत वर्तमानाची काळजी करा.
* * *
तुम्हाला माहीत आहे, का की आतापर्यंत तुम्ही गमावलेला काळ कधीही तुमच्या आजची बरोबरी करू शकत नाही.
* * *
भूतकाळात आपल्या हातून घडलेल्या चुका आणि उद्याच्या काळजीची भीती याच्या विचारात तुम्ही आपला आज वाया घालवू नका.
* * *
आपले भविष्य सुधारण्यासाठी आपण आपल्या भूतकाळापासून धडा घ्यायला हवा. कारण भूतकाल हाच आपला सर्वात श्रेष्ठ शिक्षक असतो.
* * *
या जगात तीन प्रकारचे लोक असतात. पहिले इतिहासाचा अभ्यास करतात. दुसरे इतिहास लिहितात, त्यामुळे इतिहासाच्या पहिल्या पानावर त्यांचे नाव असते. तिसरे लोक इतिहास निर्माण करणारे असतात. त्यामुळे पूर्ण पुस्तक फक्त त्यांच्याबद्दलच लिहिलेले असते.
* * *
महापूर किंवा दुष्काळ याचा विचार न करता प्रत्येक शेतकरी असाच विचार करीत असतो, की पुढच्या वर्षी आपण नक्की श्रीमंत होऊ. या शेतकर्‍याप्रमाणे तुम्हीही आपले विचार सकारात्मक ठेवा.
* * *
भविष्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नसणे खूप बरे असते कारण नाही तर आपण एक क्षणही सुखाने राहू शकणार नाहीत. भविष्याची काळजी ही अशा प्रकारची वाळवी असते, जी आतल्या आत माणसाला पोखरून पोकळ करून टाकते
* * *
आपल्या उद्याचा विकास करण्यासाठी विचारपूर्वक आज परिश्रम करायला तयार रहा.
* * *
प्रत्येक व्यक्तीचे जीवन फक्त वर्तमानातच स्थिर असते. कारण भूतकाळात तर काम होऊन गेलेले असते आणि भविष्य तर अनिश्चित असते.
* * *
प्रत्येक समजूतदार व्यक्तीच्या सोबत भूतकाळ असतो, त्यापासून धडा घेऊन तो पुढे वाटचाल करीत राहतो आणि प्रत्येक मूर्खासोबत भविष्यकाल असतो, ज्याच्या काळजीत तो नेहमी झुरत असतो.
* * *
कोणत्याही दु:ख आणि भीतीशिवाय तुम्ही तुमचा भूतकाळ आणि भविष्य याचा विचार करीत असता तेव्हा तुम्ही सफलतेच्या मार्गावर असता.
* * *
तुम्ही वर्तमान अशा प्रकारे जगायला हवा, की त्यामुळे तुमचे भविष्य वाया जाता कामा नये. तुमचा आज हेच उद्याचे प्रतिबिंब असते.
* * *
आपला वर्तमान सफल करण्यासाठी सतत आपले काम करीत रहा. वर्तमान चांगले असेल, तर भविष्य नक्कीच चांगले असते.
* * *
इतिहासाच्या पानात सफल व्यक्तीची जीवनगाथा भरलेली असते. तुम्हीही असे काही तरी करायला हवे, की त्यामुळे इतिहास सुद्धा तुमच्या सफलतेचा साक्षिदार व्हायला हवे.
* * *
जीवन जगण्यासाठी भविष्याची काळजी असायला हवी, पण ते समजून घेण्यासाठी भूतकाळाची पानेही उलटून पहायला हवीत.
* * *
तुम्ही उद्या कोण होणार, हे आज ठरवित असतो, कारण तुम्ही आज काय करीत आहात यावरूनच तुमचे चांगले किंवा वाईट भविष्य नक्की होत असते.
* * *
निरोगी मेंदूमुळे निरोगी शरिराची निर्मिती होत असते, त्यासाठी आजचे विचार ग्रहण करा आणि उद्याचे विचार धुऊन काढा. उद्याचा विचार करू नका, त्यासाठी अजून खूप वेळ आहे. तो येईल तेव्हा पाहता येईल.
* * *

कोणीही व्यक्ती अनेक किंवा मोठी चूक न करता थोर व्यक्ती होऊ शकत नाही.

 
अनुभव, धडा
आपल्या चुकांपासून आपण घडा घ्यायला हवा, कारण अनेक वेळा एखादी क्षुल्लक चूकही मोठ्या सुधारणेसाठी सुखद कारण होत असते.
* * *
आपल्या अनुभवाचा लाभ घेणार्‍या व्यक्तीला चतूर म्हणतात. सफल व्यक्ती मात्र दुसर्‍याच्या अनुभवाचा फायदा करून घेत असते.
* * *
अनुभव घेण्यासाठी आपल्याला अनेक पट जास्त किमत चुकवावी लागते; पण त्यापासून आपल्याला मिळणारी शिकवण दुसर्‍या कशापासूनही मिळू शकत नाही.
* * *
एखाद्या व्यक्तीने मला पहिल्यांदा फसवले असेल, तर त्याला तेव्हा लाज वाटायला हवी; पण त्याच व्यक्तीने मला दुसर्‍यांदा फसवले, तर मात्र मला त्यावेळी लाज वाटायला हवी. लाज यासाठी की एकदा फसवणूक झाल्यावरही मी त्यापासून काहीही धडा घेतला नाही आणि पुन्हा फसवल्या गेलो.
* * *
तुम्हाला दुसर्‍या व्यक्तीचा अनुभव कळला असेल, तर तुमच्यासाठी तो एक नवीन अनुभव असतो.
* * *
तुम्हाला जे हवे असते, त्याच्याऐवजी तुम्हाला दुसरेच काही मिळाले तर त्याला अनुभव म्हणतात.
* * *
दुसर्‍याच्या अनुभवापासून शिका आणि शक्य होईल तितका त्यापासून लाभ मिळवा. अशा प्रकारे मग तुम्ही बुंद्धिमान लोकांच्या रांगेत जाऊन बसता.
* * *
आपला येणारा प्रत्येक दिवस हा आपल्याला गेलेल्या अनेक वर्षांपेक्षा मोठा वाटत असतो.
* * *
ओव्या लहान असतात; पण त्यांची रचना करण्यासाठी खूप मोठा अनुभव लागत असतो.
* * *

 
अहंकार
दुसर्‍याचा प्रकाश विझवून तुम्ही जर आपला प्रकाश पाडीत असाल, तर हा उजेड म्हणजे तुमच्या अंहंकाराचे प्रतीक आहे.
* * *
आपले पद किंवा स्थान याचा अभिमान बाळगणारा कधीही मोठा होऊ शकत नाही, तर अभिमान दाखवून ती व्यक्ती आपण आपल्याला कोते असल्याचे सिद्ध करीत असते.
* * *
तुम्ही स्वत:ला खूप जास्त रूबाबदार आणि शूर -वीर समजत असाल, तर दुसर्‍याच्या कुत्र्याला आदेश देऊन पहा म्हणजे तुम्ही किती शूरवीर आहात ते तुमचे तुम्हाला कळते.
* * *
गुन्ह्य

  • Univers Univers
  • Ebooks Ebooks
  • Livres audio Livres audio
  • Presse Presse
  • Podcasts Podcasts
  • BD BD
  • Documents Documents