Mahan Chanakya
233 pages
English

Vous pourrez modifier la taille du texte de cet ouvrage

Découvre YouScribe en t'inscrivant gratuitement

Je m'inscris

Mahan Chanakya , livre ebook

-

Découvre YouScribe en t'inscrivant gratuitement

Je m'inscris
Obtenez un accès à la bibliothèque pour le consulter en ligne
En savoir plus
233 pages
English

Vous pourrez modifier la taille du texte de cet ouvrage

Obtenez un accès à la bibliothèque pour le consulter en ligne
En savoir plus

Description

He is the pioneer of an intellectual tradition initiated for the orderly conduct of the Indian economic, political, academic, and social system. He eliminated the enemies by his strategies. He gave a coveted position to Sanskrit literature by his sheer brilliance. He presented his entire life to others as a benchmark to be studied. He gave importance to character, pride, and commitment towards duty. The name of such a colossus is 'Chanakya'. He was endowed with a sharp intellect, strong resolution, sheer brilliance, foresight and thus a man of that era. He had only one motto in his life - 'Buddhirdasa Balam Tasya' i.e, One, who has intelligence has the might!Keeping in mind the growing popularity of Chanakya's literature among the readers, we have published this 'Combined Edition'. It is our aim to make Chanakya's invaluable wealth as a great scholar, easily available so that everyone can lead a planned and prosperous life. Also, I personally feel that everyone must read this book. - Acharya Rajeshwar Mishra

Sujets

Informations

Publié par
Date de parution 01 janvier 0001
Nombre de lectures 0
EAN13 9789352785667
Langue English

Informations légales : prix de location à la page 0,0132€. Cette information est donnée uniquement à titre indicatif conformément à la législation en vigueur.

Extrait

ज्योतीषांनी बरोबरच म्हटलं होतं - “चणी! यासारखा बालक तर शतकानंतर एखाद्या भाग्यवंताच्या घरी जन्माला येतं. सुख त्याच्या पायाशी लोळण घेईल. वैभव त्याच्या पुढे-पुढे नोकराप्रमाणे चालत राहील आणि राजयोगी असूनही त्याला युगपुरूष नव्हे महापंडीतही म्हटल्या जाईल. समाजाला हा एक नवीन व्यवस्था देईल आणि समग्र आर्यावर्तावर त्याची शासनव्यवस्था प्रस्थापित करील. हा बालक केवळ आपल्या बोटांच्या ईशार्‍यावर परकीयांची सत्ता उलथून टाकील. देशाचा सम्राट कोणाला करायचे हे तो ठरवेल आणि भारताचा गौरव वाढवील!” त्याच `चाणक्य’ नावाच्या बालकाचं नाव जगविख्यात झालं.
ज्याने भारतीय अर्थव्यवस्था, राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक व्यवस्थेला सुनियोजीत ठेवण्यासाठी एका सर्वोत्तम बौद्धिक परंपरेला जन्म दिला. आपल्या कूटनीतिने शत्रुंचा बिमोड केला. आपल्या प्रतिभेने संस्कृत-साहित्याला महत्त्वाचं स्थान दिलं. आपल्या संपूर्ण जीवन पद्धतीला इतरांना शिक्षित करण्यासाठी वाहून घेतलं. ज्याने आयुष्यभर चारित्र्य, स्वाभीमान आणि कर्तव्यनिष्ठेला प्राधान्य दिलं त्याच पुरूषोत्तमाचं नाव `चाणक्य’ आहे.
महान चाणक्य
जीवन आणि समग्र साहित्य
• जीवन • चाणक्य नीती • चाणक्य सूत्र • कौटिल्य अर्थशास्त्र
 

 
eISBN : 978-93-5278-566-7
© प्रकाशकाधीन
X-30 ओखला इंडस्ट्रियल एरिया, फेज-II
नई दिल्ली- 110020
फोन : 011-40712100
ई-मेल : ebooks@dpb.in
वेबसाइट : www.diamondbook.in
संस्करण : 2017
Mahan Chanakya (Marathi)
By : Acharya Rajeshwar Mishra
भूमिका
चा णक्याला आज कोण ओळखत नाही! ज्याने भारतीय अर्थव्यवस्था, राजकीय व्यवस्था, शैक्षणिक व्यवस्था आणि सामाजिक व्यवस्थेला सुस्थापित करण्यासाठी एका नव्याच विचारांना जन्म दिला. कूटनीती वापरून ज्याने आपल्या शत्रुंना संपवले, आपल्या प्रतिभेने ज्याने संस्कार साहित्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं. आपली संपूर्ण जीवनशैली ज्यांनी दुसर्‍याला शिक्षित करण्यासाठी खर्च केली, स्वत: सम्राट न होता चंद्रगुप्ताला सम्राट केलं, ज्यानं चारित्र्य, स्वाभीमान आणि कर्तव्यनिष्ठेला प्राधान्य दिलं, त्याच पुण्यशिरोमणीचे नाव `चाणक्य’ आहे.
चाणक्याचा जन्म इ. स. पूर्व तिसर्‍या शतकातला समजला जातो. त्यांच्या वडीलाचे नाव `चणक’ असे होते. त्यांचा जन्म मगघ साम्राज्यातील कुसुमपूर गावात (पटना) झाला होता. तिथे नंदवंशाची सत्ता होती. चाणक्य जन्माने ब्राह्मण होते. सावळ्या रंगाच्या चाणक्याचा चेहरा गंभीर होता. विद्वानात असणारी सर्व लक्षणं चाणक्याच्या जन्माच्या वेळी ज्योतिषांनी त्याच्याबाबतीत सारं काही सांगितलं होतं. “चणी! असं बाळ तर शतकांमधून एखाद्याच नशीबवानाच्या घरी जन्माला येतं. सुख त्याच्या पायाशी लोळण घेईल. वैभव तर नोकरासारखं त्याच्या मागे मागे असेल आणि महामात्य असून तो युगपुरुष ठरेल. इतकेच नाही तर महापंडित होईल. हा समाजाला एक नवी व्यवस्था देईल आणि पूर्ण आर्यावर्तात स्वत:ची शासनव्यवस्था प्रस्थापित करील. हे बालक आपल्या बोटाच्या इशार्‍याने परदेशी राज्यकर्त्यांची पाळेमुळे उखडून टाकेल. हाच सम्राट कोण असेल जाहीर करील आणि भारताचा गौरव वाढवील.” हे सारं काही खरं ठरलं.
अत्यंत कुशाग्र बुद्धिचा असल्यामुळे किंवा वडीलांचे नाव `चणक’ असल्यामुळे त्याचं नाव `चाणक्य’ पडलं. बालपणाचं नाव `विष्णुगुप्त’ होतं. तक्षशिलेमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. ते तीक्ष बुद्धिमत्तेचे, निर्णयाचे पक्के, प्रतिभासंपन्न, दूरदर्शी व युग निर्माता होते. त्यांच्या जीवनाचा एक उद्देश होता, बुद्धियस्य बलं तस्य.
जीवन : प्रस्तुत पुस्तकात आरंभी चाणक्याचे जीवन दिले आहे. कादंबरी स्वरूपात याचं लेखन झालं आहे. आचार्य चाणक्याच्या जीवनाशी संबंधीत समग्र माहिती सोप्या शब्दांत मांडण्यात आली आहे. त्यांचं बालपण, तारुण्यकाल, शिक्षण, प्रतिज्ञा, धोरणात्मक युद्धातला विजय, सहयोग व त्यागाला सुंदरपणे शब्दबद्ध केलं आहे. ज्यातून वाचकांना वाचण्यासाठी रंजकता आणि ऐतिहासिक माहिती मिळू शकेल.
धोरण : `चाणक्य नीती’ प्रसिद्ध आहे. बहुधा अनेकजण त्यांच्या शब्दाला वजन प्राप्त व्हावं म्हणून या उपदेशयुक्त नीतीवचनांचा आधार घेतात. ही धोरणं खरोखरच फार उपयुक्त आहेत आणि जगण्याची योग्य दिशा सांगून जातात. या धोरणांचं पालन केले तर जीवनात (कोणत्याही क्षेत्रात) पराभवाचं तोंड पाहण्याची वेळ येत नाही.
सूत्र : `चाणक्य सूत्र’ वास्तवत: हे सूत्र आहेत, जे लक्षात ठेवायला अत्यंत सोपे आहे. हे ते सूत्र आहेत जे जीवनाच्या कोणत्याही प्रसंगी गुरूमंत्र म्हणून उपयोगी पडतात. साम-दाम-दंड-भेद यांची योग्य व्याख्या करून आपल्याला जीवन जगण्याची सुंदर कला प्रदान करतात. या पुस्तकात सोप्या शब्दात थोडक्यात सांगण्यात आले आहे.
अर्थशास्त्र : चाणक्याचेच नाव कौटिल्य होतं. खरं म्हणजे कुटिल (कपटी) धोरणांमुळे अथवा `कुटील’ गोत्रात जन्म झाल्यामुळे त्याचं नाव `कौटिल्य’ पडलं. या अर्थशास्त्रावरच्या जास्तीत जास्त प्रकरणात राज्य-व्यवस्था व कायद्याची कलमे स्पष्ट पद्धतीने व संक्षिप्त लिहिण्यात आली आहेत. सामान्य वाचकांना डोळ्यासमोर ठेवून मांडणी करण्यात आली आहे.
चाणक्य - साहित्याची वाढती मागणी लक्षात घेऊन ही `संयुक्त आवृत्ती’ प्रकाशीत करण्यात आली आहे. आशा आहे की चाणक्याचे जीवन, धोरणं, सूत्र आणि अर्थशास्त्र हे सारं एकत्रित उपलब्ध करून दिल्याचा वाचकांना आनंदच होईल. आमचा हाच उद्देश आहे की महापंडित चाणक्याचे अनमोल ज्ञानभंडार वाचनीय व्हावे. जे वाचून वाचक आपलं जीवन सुनियोजीत करू शकतील,
– आचार्य राजेश्वर मिश्र
३/७, एम.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली – ११००१६
अनुक्रमणिका चाणक्याचे जीवन बालपण चाणक्याची प्रतिज्ञा चंद्रगुप्ताचा शोध तक्षशिलेत चाणक्य मगधात वसंतोत्सव सिकंदरची आक्रमक घोडदौड सिकंदर आणि पर्वतेश्वराचे युद्ध सिकंदरचे पुन्हा आगमण नंद राज्याचा शेवट यवनांचे पुन्हा आक्रमण शेंडी बांधली चाणक्य नीति अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा चाणक्य सूत्र कौतिल्य अर्थशास्त्र मनवीय व्यवस्था आणि त्यांचे कर्तव्य राहकीय पद व्यवस्था धार्मिक व्यवहार संकटाचा सामना सामाजिक संबंध राज्य विस्ताराची व्यवस्था राजा आणि राज्य सुख संकट / व्यसनाचे स्पष्टीकरण नीती वापरुन यश युद्धाविषयी महिती संगठनाची अनिवार्यता निर्बलतेच्या अवस्थेत संकटापासून बचाव शत्रू विनाशासाठी जडी बुटीचा प्रयोग शत्रू विनाशासाठी तंत्र प्रयोग
चाणक्याचे जीवन
बालपण
कु सुमपूर! होय, तेच कुसुमपूर. किती छोटं गाव होतं ते! इथेच मी मोठा झालो. याच गावाला दुष्ट नंदाने उद्ध्वस्त करून टाकलं होतं. आज वस्ती असूनही नरक यातना भोगणारी वस्ती वाटत आहे. किती मुडदे जाळण्यात आली, काहींना तर धड अग्नीही मिळाला नाही. कित्येकांचे घार-गिधाडांनी लचके तोडले. काही हिशोब नाही.
चालत-चालत चाणक्य एका वटवृक्षाखाली येऊन उभे राहिले. दिवस मावळतीला गेला होता. अचानक चाणक्य हट्टाला पेटले. त्यांच्या समोर भूतकाळ भूतासारखा नाचू लागला.
कुसुमपुर हे लहानसं खेडं! एकूण दहा-वीस घरांची वस्ती. बाजूला शेती. झोपडीवजा घरं. झोपडी ती कसली! मोठ्या लाकडांवर गवताच्या पेंढ्या टाकलेल्या, उन्हापासून बचाव व्हावा म्हणून; पण! नंदाच्या सैनीकांप्रमाणेच उन्ह मुद्दाम गवताच्या पेंढ्यातून घरात घुसायचं, पावसाळ्यात ते गळायचं. आतील सर्वच भिजून जायचं. तशातच नंद सैनीकांची दहशत. कोणास माहीत कोण कधी पाऊसासारखं झोपडीत घुसेल आणि घरात नुकत्याच तारूण्यातल्या कळीला तोडून राजाला फुलासारखी वाहीली जाईल. वर्षा आणि उन्हांचे दैवत इंद्र आणि सूर्याला एकावेळी अशा प्रकारची अत्याचार करून आणलेली भेट चालणार नाही; पण मनुष्याच्या भेटीचा अट्टाहास ठेवणार्‍या ह्या दानवी वृत्तीच्या राक्षस नंदाला नवतारूण्यात आलेल्या युवतींचा भोग घेण्याची चटकच लागली होती.
चाणक्याचे वडील चणक ब्राह्मण होते. समाधानी, सदा धर्मनिष्ठ. कधी कोणासमोर हात न पसरविणारे. कर्मकांड करत कसंबसं जीवन जगत होते. त्याच काळात झाला चाणक्याचा जन्म! समजा की एका दगडाला तडे जाऊन त्यातून निघालेल्या प्रकाशकिरणांनी झोपडीला प्रकाशमान केलं. पुत्र जन्माच्या आनंदानं चणक आणि त्यांच्या पत्नीला आकाशाएवढा आनंद झाला. चणक आणि त्यांची पत्नी दोघेही सुयोग्य जोडपं होतं. त्या काळात राजाच्या अत्याचाराचा काळोख, क्रूर सैनीकांची दहशत आणि भीती काळ्या ढगांसारखी राज्याच्या भविष्यरूपी आकाशात विहरत होती. कदाचित त्या भीतीचाच अभिशाप म्हणा, चाणक्याचं बाळसं चांगलं असलं तरी तो कृष्णवर्णीय कांतीचा होता.
आईसाठी बाळ ते बाळ असतं, काळं काय नि गोरं काय, अशा मंगल समयी चणीने लाडक्या बाळाचे भविष्य पाहण्यासाठी ज्योतिषांना निरोप दिल्यावर चणी तत्काळ झोपडीत गेला. त्याने आईजवळून बालकाला हिसकावून घेतले आणि बाहेरच्या दगडाने त्याच्या तोंडातील दोन्ही जन्मजात दातांना काढून टाकले.
वटवृक्षाखाली बसलेल्या चाणक्याच्या डोळ्यांसमोरच भूतकाळाचे एक-एक पान वाचले जात होते. अचानक त्याचा हात त्याच्या तोंडावर गेला. सगळी दातं जागेवर होती; पण पुत्र-प्रेमापोटी वडीलांनी जे दोन दातं पाडली होती त्यातील पोकळी कायम होती. चाणक्याच्या तोंडून अचानक निघून गेलं - काय बाबा...!
होय, वडीलांना असे वाटत होते की, ज्या दोन जन्मजात दातांमुळे ज्योतिषांनी जे भाकीत सांगितलं होतं ते खोटं ठरेल आणि तो एक सामान्य म्हणून जीवन जगेल.
कारण त्याच्या मनात नंद राजाची भीती घर करून बसली होती. म्हणूनच चाणक्याच्या वडीलांना त्याचं राजा होणं मान्य नव्हतं.
परंतु नशीबाला कोण बदलू शकतं. वर्षानंतर दुसर्‍यांदा ज्यावेळी ते साधुसंत भटकत भटकत कुसुमपुरला आले, मागचा पाहूणचार लक्षात घेऊन त्यांनी चणीच्या झोपडीसमोरच कुटी उभारली. चणी घरी नव्हता. बालक चाणक्य, चणीनं त्याचं नाव चाणक्य ठेवलं होतं. रांगत रांगत बाहेर आलं. त्याला पाहून साधू आश्चर्यचकित झाले.
“अरे! याच्या दातांना काय झालं? काय ते आपोआप पडले?” ते विचार करीत असतानाच चणी तिथे दाखल झाला. त्याची पत्नी आतमध्येच होती; पण ते बाळ त्या साधुंच्या मांडीवर हसत–खेळत होतं.
“काय ब्राह्मण! या बालकाच्या दातांना काय झालं?”
“महाराज! मला असे वाटले की जर हे बालक राजा झाले तर निश्चितच व्यसनांच्या आहारी जाऊन दुराचारी वर्तन करील आणि एक दिवशी हे देखील नंदराजासारखंच अपयशाच्या जाळ्यात फसेल. म्हणून मी स्वत:च त्याचे दातं पाडली आहेत.”
“तू तर निव्वळ मूर्ख निघालास ब्राह्मणा! अरे जे खुद्द विधात्यानेच लिहिले आहे. जन्मजात दातांमुळे आम्हाला ते समजले होते ते काय तुझ्या दातं पाडण्यामुळे. टळणार आहे काय? अरे! तू तर केवळ राजाचाच विचार केलास, वास्तवात हा राजाच नाही तर राजापेक्षा मोठा राजाला घडविणारा, राज–निर्माता आणि या समग्र आर्यावर्ताला दहशतीपासून मुक्त करणारा. आपल्या संस्कृतीची प्रतिष्ठापना करणारा, जगद्विख्यात, सुधारक म्हणून ओळखल्या जाईल.”
“चणी तू मूर्ख आहेस! भावनिक होऊन तू त्याच्या तोंडाचं बोळकं केलंस; परंतु त्याच्या नशिबात जे आहे ते तूच काय; पण त्याच्या हातावरील रेषांनाही पुसून टाकता येणार नाही. अडाणी माणसा! वडील केवळ जन्म देणारं एक साधन असतं. बालकाची वाढ होते ती आईच्या गर्भात, रक्त, ऊर्जा, प्राण, चेतना आणि वातावरण आईच देत असते.”
“दातं पाडताना तू तुझ्या गृहलक्ष्मीला विचारले होते? व्यक्तीच्या अधिकाराचा पहिला भाग त्याची पत्नी असते आणि त्यानंतर त्याचं संतान. अशा वागण्यामुळे तुझ्या पत्नीवर आणि मुलावर, अशा दोघांवरही अन्याय झाला आहे.”
“आम्हाला सांग, तुझ्यात आणि नंदामध्ये आता काय फरक आहे?”
“तुझ्या आणि त्याच्या कृत्यात कोणता फरक करायचा? चणी तू देखील दुष्कृत्याचा शिकार झाला आहेस.”
“याचा तर मी विचारच केला नाही. मी ब्राह्मण आहे. शास्त्राचं ज्ञानही आहे; पण असे विचार माझ्या मनात आलेच नाहीत.”
“शास्त्राला जबाबदार धरून नकोस, शास्त्राचा अर्थ आहे काळसिद्धता आणि समाज परिस्थितीनुसार त्याचा अर्थ लावणे, समाज–व्यवहार शास्त्राला दिशा देतं.

  • Univers Univers
  • Ebooks Ebooks
  • Livres audio Livres audio
  • Presse Presse
  • Podcasts Podcasts
  • BD BD
  • Documents Documents